डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे डॉ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. 1- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, देवमाणूस, दीनदुळ्यांचे कैवारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, वाचनप्रिय, क्रीडाप्रेमी, निसर्गप्रेमी, स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांना जन्म दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. होते. यावेळी सर्व प्रथम डॉ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. त्यानंतर श्री कुलकर्णी एस.एस.,श्री केदार सी.डी.,श्री. सोनवणे डी.एन., पर्यवेक्षक श्री केला डी.जी. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सागर ए. एम. यांनी आपल्या मनोगतातून डॉ.साहेबांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे ज्ञानेश्वर यांनी केले.

 Dang Seva Mandal
              Dang Seva Mandal 
                   
                   
                   
                   
                  