डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे वनभोजनाचे आयोजन
पेठ, दि- २० डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची एक दिवशीय पावसाळी सहलीचे (वनभोजन) आयोजन करण्यात आले होते. ही सहल मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस., पर्यवेक्षक श्री केला डी. जी. यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी झाली.
यात सर्व प्रथम विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात वैयक्तिक गीत गायन, समूह गीत गायन, विनोद, कथा, नृत्य असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण करून विद्यालयात सहलीची सांगता करण्यात आली.
Dang Seva Mandal