[email protected] +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

जनता विद्यालय अभोणा येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
अभोणा, ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे नाशिक जिल्ह्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज (तात्यासाहेब) यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी सर्वप्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मयुरी आहेर व शुभांगी गांगुर्डे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्रीमती प्रियंका खैरनार, श्री परेश देसाई, श्री खुरकुटे गंगाधर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्व व कुसुमाग्रज यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोवा एस एस यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी मराठी भाषेची थोरावी सांगितली. या कार्यक्रमासाठी उपमुख्यध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस श्रीमती भारती गायकवाड, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.