[email protected] +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा
पेठ ता. ३- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय क कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री पाटील सरांनी दिव्यांग दिन साजरा करण्यामागील उद्देश सांगितला. तसेच दिव्यांगानाही सामाजात मानाचे स्थान द्यावे व सन्मानाने वागवावे असे मत प्रतिपादन केले.  दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयापासुन  पेठ  शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी मॅडम, श्री आहेर डी टी सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.